
महाराष्ट्राची जनता हीच आमचे दैवत आहे. या जनेतेने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला अभुतपूर्व यश मिळाले आहे. मी याच दैवताचे दर्शन घेण्यासाठी महाजनादेश यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर फिरत असून आज पाथरीत आलो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाथरी येथील जि.प. शाळेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेच्या सभेत केले.
यावेळी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, आमदार मोहनराव फड, माजी आमदार विजय गव्हाणे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे ओमप्रकाश शेटे, महाजनादेश यात्रेचे आयोजक सुरजितसिंह ठावूâर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, सुरेश भुमरे, डॉ. उमेश देशमुख, उद्धव नाईक, माधव गिरे, शिवराज नाईक, विजयपाटील सिताफळे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकत्र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील पाच वर्षात युती सरकारने केलेली कामे घेवून मी जनतेपर्यंत आलो आहे. सध्या विरोधकांना बोलण्यासाठी कुठलाही विषय नसून इव्हिएम मशीनबद्दल वारंवार बोलल्या जात आहे. परंतु इव्हिएम मशीनमध्ये बिघाड नसून विरोधकांच्या डोक्यात बिघाड आहे. त्यामुळे आगामी काळात विरोधी पक्षनेता देखील हसण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. काँग्रेस पेक्षा युती सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला. परभणी जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीकाचा विमा लवकरच विमा कंपनीकडून मी मिळवून देणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना वारंवार दुष्काळाचा सामाना करावा लागत आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी रुपयांची वॉटर ग्रिडची योजना राबविण्यात येणार आहे. आपल्या सरकारने ३० हजार कि.मी.चे रस्ते तयार केले. तर १० हजार कि.मी.चे राज्य रस्तेही तयार केले आहेत.
पाथरी तालुक्यातील तारुगव्हाण बंधाऱ्यासाठी आत्तापर्यंत १७८ कोटी रुपये दिले आहे. या बंधाऱ्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामही लवकरच मार्गी लागणार आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक गरीबाला घर दिल्या जाणार आहे. आरोग्य सेवाही ४ लाखांच्या खचापर्यंत मोफत दिल्या जाणार आहे. युती सरकारने नेहमीच गरीबांच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे. तर केंद्रात ऐतिहासीक निर्णय घेवून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात बलशाली राष्ट्राची निर्मिती होत आहे. ही अभिमानाची बाब आहे.
पाथरी मतदार संघाचा विकास करण्याचा संधी मिळाली – आमदार मोहन फड
सा.बा. विभागामार्फत पाथरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची कामे मागील पाच वर्षात मार्गी लावले. सोनपेठ, पाथरी, मानवत या तिन्ही न.प.मध्ये चांगले काम करण्याची संधी मिळाली. आरोग्य क्षेत्रातही गोरगरीबांना चांगला लाभ देण्यात यश आले. तसेच पाथरी मतदार संघातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीकाचा पीक विमा मिळावा, ढालेगाव बंधाऱ्यातील पाणी शेतकऱ्यांसाठी उपयोगी आणावे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा नियमित करावा. पाथरी शहर हे साई जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या शहराचा विकास करावा, असे मत आमदार फड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर व्यक्त केले.


































































