गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासाठी मिंधेंचा आटापिटा; विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना धरले वेठीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवा फंडा शोधला असून, त्यासाठी राज्यातील शाळा वेठीस धरल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेशपत्र राज्यातील सर्व शाळांमधील दोन कोटी 11 लाख विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले असून, त्यावर दोन दिवसांत लेखी अभिप्राय घेण्याचा खटाटोप सुरू केला आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हैराण झाले आहेत.

राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांकडून हा आटापिटा सुरू आहे. सर्वसाधारणपणे हा उपक्रम विद्यार्थिप्रिय असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव झळकविण्यासाठी हे सगळे सुरू असून, त्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळा, याचबरोबर शिक्षण विभागातील अधिकाऱयांना रात्रंदिवस कामाला लावले आहे.

राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी यासंदर्भात राज्यातील सर्व शाळांना आदेश जारी केला आहे. शासकीय अनुदानित आणि खासगी शाळांना त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी बंधन घालण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाअंतर्गत राज्य शासनाने ‘www.mahacmletter.in’ हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रातील मजकूर व शिक्षणविषयक अभिप्राय हस्ताक्षरात लिहून त्याचा पह्टो नमूद संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे.
‘Largest online photo album of Handwritten Notes in 24 hours’ असे नाव त्याला देण्यात आले आहे.

विद्यार्थी आणि पालकांना करावा लागणार हा खटाटोप
 पालकांनी मुख्यमंत्र्यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे. पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोटय़ा वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.  या पानावर मुलांनी बॉलपेनने स्वतःच्या हस्ताक्षरात पत्राविषयी त्यांचा शिक्षणविषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करणे आवश्यक केले आहे.  ज्या पालकांना लेखन करता येत नाही, त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करून घेता येईल. हा अभिप्राय पाच ते सहा ओळींमध्ये असावा.  पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा पह्टो आपल्या मोबाईलच्या पॅमेऱयात काढायचा आहे. यानंतर शिक्षण विभागाच्या ‘www.mahacmletter.in’ वेबसाइटवर जाऊन स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर अभिप्राय लिहिलेल्या पानाचा पह्टो अपलोड करावयाचा कालावधी आज सोमवार (दि. 26) ते मंगळवार (दि. 27) सकाळी 8.59पर्यंत होता.