लोकल 24 तास करून गर्दी टाळणे शक्य; मुख्यमंत्र्यांचे एसओपी तयार करण्याचे निर्देश

लोकल सुरू करतानाही ‘पिक’ हा शब्द काढून टाका असे सांगितले होते. पिक अवर ऐवजी, चोवीस तास का नको. चोवीस तासांच्या विभागणीत काम करून गर्दी आणि विविध यंत्रणांवरील ताण टाळणे शक्य आहे. शिस्त पाळून काम करा. कामाच्या ठिकाणी  कर्मचाऱयांची जबाबदारी घ्या. त्यांच्या खाण्याची आणि येण्या-जाण्याची व्यवस्था यासाठी नियोजन करा. यासाठी चांगली एसओपी तयार करून ती सादर करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

बँका, खासगी कार्यालये यांनी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावे

चार्टर्ड अकाउंटट आणि कंपनी सेक्रेटरीज यांनी कामाच्या वेळांची विभागणी आणि कार्यप्रणालीत बदलाची एसओपी सादर करावी. जेणेकरून या दोन्ही क्षेत्रातील व्यावसायिकांना कामकाज करणे सुलभ होईल. तसेच ही एसओपी इतरांनाही मार्गदर्शक ठरेल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिले. या दोन्ही क्षेत्रांतील व्यावसायिकांच्या संघटनांच्या पदाधिकारी सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. बँका, खासगी कार्यालये यांनी वेळांची विभागणी करून वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावे. वर्क फ्रॉम होम कार्यपद्धती अवलंबावी, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या