
महाराष्ट्र पोलीस दलाला कर्तव्यदक्षतेचा समृद्ध वारसा आणि इतिहास आहे. पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि त्याच गतीने क्षणोक्षणी स्वरूप बदलणारी गुन्हेगारी ही महाराष्ट्र पोलीस दलासमोरची आजची मोठी आव्हाने आहेत. अशाही परिस्थितीत या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी पोलिसांनी दाखवलेले धैर्य व शौर्य हे गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अॅपॅडमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 118व्या दीक्षांत संचलन समारंभाप्रसंगी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, एकीकडे आमचे पोलीस गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना दिसतात, तर दुसरीकडे कोरोना संकटाचा सामनाही करतात. दिसणाऱया शत्रूवर आपण तुटून पडतो, पण आजही न दिसणाऱया कोरोनासारख्या शत्रूशीही पोलीस जिवाची बाजी लावून लढताहेत, याबद्दल पोलिसांचे काwतुक करावे तेवढे थोडे आहे.
यावेळी पोलीस महासंचालक रजनीश शेठ, अपर पोलीस महासंचालक संजयकुमार, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, अॅपॅडमीच्या संचालिका अश्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, प्रभारी सहसंचालक तथा उपसंचालक गौरव सिंग, शिरीष सरदेशपांडे, काकासाहेब डोळे, सहायक संचालक अभिजीत पाटील आदी अॅपॅडमीत प्रत्यक्ष उपस्थित होते.
शुभांगी शिरगावे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी
या तुकडीतील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी शुभांगी चंद्रकांत शिरगावे ठरल्या, त्यांना मानाची रिव्हॉल्वर, उत्कृष्ट आंतरवर्ग प्रशिक्षणार्थी आणि सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थीसाठीचा ‘अहिल्यादेवी होळकर चषक’नेही सन्मानित करण्यात आले. सलीम शेख यांना उत्कृष्ट बाह्यवर्ग प्रशिक्षणार्थी, तर अविनाश वाघमारे यांना द्वितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून गौरविण्यात आले.
माणुसकी, बंधुत्वाच्या भावनेतून कर्तव्य करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पोलीस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना नियमानं, कायद्यांनं वागा; परंतु कायदा पाळताना, तुमच्यातील माणुसकीची, बंधुत्वाची भावना हरवू नका. तुम्ही घातलेल्या खाकी वर्दीच्या आत जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंतच तुमच्या खांद्यावरच्या स्टारना किंमत आहे, हे कायम लक्षात ठेवा, असे मार्गदर्शन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. रोज कष्ट करुन रोजंदारीवर पोट भरणाऱया लोकांच्या वेळेचं, श्रमाचं मोल समजलं पाहिजे. ही सामाजिक जाणीव असेल तरंच पोलीस स्टेशनमध्ये मदतीसाठी आलेल्या सामान्य माणसाला तुम्ही न्याय देवू शकाल, असेही ते म्हणाले.
होश आणि जोश!
प्रसंगावधानता हा अत्यंत महत्त्वाचा गुण पोलिसांच्या अंगी आवश्यक असतो. कधीकधी एखादी कारवाई केली आणि नाही केली तरीही प्रश्न उपस्थित केले जातात. अशा वेळी ‘होश आणि जोश’ यांचे तारतम्य ठेवून निर्णय घ्यावेत. भविष्यात तुमची स्वप्नं ही केवळ तुमची स्वप्नं नाहीत, तर ती संपूर्ण महाराष्ट्राची स्वप्नं आहेत. हे सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक जनतेचा विश्वास सार्थ ठरवतील, असा आशावादही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.























































