सीएनजी 6 आणि पाइप गॅस साडेतीन रुपयांनी स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारपासून सीएनजी व पीएनजीवरील व्हॅट कमी झाला आहे. त्यामुळे मुंबई परिसरात सीएनजी प्रति किलो 6 रुपयांनी तर पाइपद्वारे पुरवला जाणारा स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम साडेतीन रुपयांनी स्वस्त झाला आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मूल्यवर्धित कराचा (‘व्हॅट’) दर 1 एप्रिलपासून 13.5 टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत करण्याची घोषणा केली होती. 1 एप्रिलपासून या घोषणेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे.