कोळसा खाणीत अवैध उत्खननादरम्यान अपघात, 13 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंड येथील धनबाद येथे कोळश्याच्या खाणीत अपघात होऊन 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी धनबाद येथील निरसा प्रखंड येथील मुगमा भागात 20 फूट उंचावर कातळ कापण्याचं काम सुरू होतं. त्याच वेळी या खाणीवर मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि बालकामगार अवैधरित्या काम करत होते. अचानक वरून कातळाचा तुकडा कोसळला आणि त्यामुळे भीषण अपघात झाला.

या ढिगाऱ्याखाली सापडून 13 जणांचा मृत्यू झाला. तसंच एक डझनहून अधिक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली. त्यानंतर कोळसा खाणीत दबलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आलं. त्यांना स्थानिक नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं.