
>> विवेक सांगळे, अभिनेता
मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो यांसारखे चांगले प्रकल्प राबवण्यात येत आहेत. कोस्टल रोडमुळे मुंबईची वाहतूक आणखी सुरळीत होईल. ज्या ठिकाणी जायला दीड ते दोन तास लागतो तिथे कोस्टल रोडमुळे 20 मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
भविष्याच्या दृष्टीने हे प्रकल्प खूप फायद्याचे ठरणार आहेत. मेट्रोच्या कामामुळे सध्या अनेक ठिकाणी मोठी गैरसोय होतेय. वाहतुकीची कोंडी होतेय. पण वाहतुकीच्या उत्तम सुविधेसाठी आणखी काही काळ ही गैरसोय मुंबईकरांनी सहन करायला हवी. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर चाकरमान्यांना लोकलमधून लटकत आणि गर्दीत धक्के खात कार्यालय गाठावे लागणार नाही.
याशिवाय मुंबई महानगरपालिकेची कामे चांगली आहेत, चांगल्या योजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना उत्तम पायाभूत सोयीसुविधा मिळत आहेत.
























































