
जगभरात आढळणाऱ्या सजीवांच्या काही प्रजातींमध्ये झुरळचा समावेश होतो. बहुतांशी रात्रीच्या वेळी यांचे राहणीमान जास्त प्रमाणात सुरु असते. दमट हवामानात, जवळजवळ सर्वच प्रकारच्या अन्नावर हे भक्षण करतात. त्यामुळे हे मानवी आरोग्यास घातक ठरतात.
झुरळाचे नाव व त्याची उत्पत्ती
cockroach या शब्दाची उत्पत्ती मूळ स्पनिश cucaracha या शब्दापासून झाली.
झुरळ सर्वात यशस्वी प्रजात ठरण्यामागे पुढील करणे आहेत
1. शरीराची ठेवण आणि शरीरावरील मेणकट थर यामुळे झुरळ अगदी छोट्या जागेतही मावू शकतात. तसेच मेणकट थर शरीरावर असल्याने पाण्याचा परिणाम शरीरावर होत नाही.
2. स्पर्शेंद्रियें – अन्नाचा शोध घेणे हे जरी त्यांचे मुख्य काम असले तरी त्याच बरोबर धोक्याची संवेदना सुद्धा मिळते.
3. तोंडातील विविध भाग – झुरळ सर्वात जास्त असण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे. यातला एक जरी अवयव नष्ट झाला तरी झुरळ मरते हे निश्चित. चावण्यासाठी आणि तुकडे करण्यासाठी विशिष्ट रचना असलेले अवयव तोंडात असतात.
4. विशिष्ट पाय आणि पंख – जे जोरात पळायला आणि अगदीच गरज पडली तर उडायला मदत करतात.
5. श्वसन संस्था – त्वचेद्वारे होणाऱ्या श्वसनामुळे जास्त मोठ्या प्रमाणात प्राणवायूचा पुरवठा होतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तग धरून राहता येते.
6. जीवन क्रम – एकाचवेळी खूप मोठ्या संख्येने अंडी घातली जातात. निसर्गनियमानुसार सर्वोत्तम सजीव जिवंत राहतात.
7. काही ठिकाणी झुरळांना अन्न आणि औषधी महत्व आहे. त्यामुळे त्यांची खास कृत्रिमरीत्या पैदास करून वाढवले जाते. या वरील सर्व कारणांमुळे झुरळ ही पृथ्वीवरील यशस्वी प्रजात मानली जाते.
कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना
चिरंतन सायगावकर यांनी ही माहिती दिली.





























































