समुद्राच्या पोटात आढळला 300 वर्षं जुना खजिना, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाण्यात बुडालेल्या एका जहाजात सुमारे 300 वर्षं जुना खजिना सापडला आहे. या खजिन्याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. हा खजिना सुमारे 17 अब्ज डॉलर इतक्या किमतीचा आहे.

हा खजिना ज्या जहाजात सापडला, ते जहाज कोलंबियाच्या तटापासून दूर समुद्राच्या तळाशी बुडालेलं आढळलं होतं. या जहाजाचं नाव सॅन जोस गॅलियन असं होतं. या जहाजावर कोलंबियन नौसेनेला खजिना आढळला होता. पण हे जहाज 1708मध्ये बुडालं आणि 300 वर्षांनंतर या जहाजाचे अवशेष आढळले आहेत. एका रोबोच्या साहाय्याने हा शोध करण्यात आला.

हे जहाज कधीकाळी स्पेनच्या नौसेनेचा मुकूट म्हणून ओळखलं जायचं. 1708मध्ये ब्रिटीश नौसेनेने हे जहाज उद्ध्वस्त केलं. या जहाजावर 64 तोफा होत्या. त्यासाठी लागणारा दारूगोळाही त्यावर होता. युद्ध सुरू असताना या दारूगोळ्याला आग लागली आणि स्फोट होऊन जहाज बुडाल. त्यात 600 चालकांचं दल होतं, तेही बुडालं. या जहाजावर सोने, चांदी, पाचूंचा साठा होता. तो देखील बुडाला.

पाहा व्हिडीओ –

2015मध्ये वूड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशनने हे जहाज शोधलं होतं. या जहाजावर बंदुकांसह असणाऱ्या दोन डॉल्फिन्सचं चिन्ह होतं. त्यावरून या जहाजाची ओळख पटली. आता कोलंबिया सरकारने या खजिन्याच्या शोधार्थ योजना राबवण्यात येत आहे. या खजिन्यात सोन्याचे तुकडे, तोफा, चिनी मातीचे कप, कांस्याची तोफ, तलवारी इत्यादी गोष्टी आहेत.