गुजरातमध्ये गणेशमिरवणुकीत दगडफेक आणि हिंसाचार; 13 जणांना ताब्यात घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या वडोदरामध्ये गणेश मिरवणुकीदरम्यान दगडफेक आणि हिंसाचाराची घटना घडली आहे. वडोदरामध्ये सोमवारी रात्री गणेश आगमनाची मिरवणूक संवेदनशील भागातून जात होती. त्यावेळी दोन समुदायांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर दगडफेकीची घटना घडली आणि हिंसाचाराला सुरुवात झाली. या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतले आहे. सुदैवाने या हिंसाचारात कोणीही जखमी झालेले नाही.

वडोदरा पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्यात दोन्ही समुदायांवर दंगल घडवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. वडोदरातील पानीगेट भागातून गणेश मिरवणूक जात असताना दोन समुदायांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर दगडफेकीची घटना घडली. दगडफेकीत एका मशीदीच्या प्रवेशद्वारावरील काच फुटली आहे. पोलीस बंदोबस्तात गणेशमुर्ती सुरक्षितपणे मंडळात नेण्यात आली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.