इमानदारीचं फळ, बॉसने कर्मचाऱयाला दिली 45 लाखांची मर्सिडीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱयांना त्यांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल गौरवतात. त्यामुळे कर्मचाऱयांचा काम करण्याचा उत्साह वाढतो. केरळमधील एका कर्मचाऱयाला असंच कष्टाचं फळ मिळाले आहे. त्या कर्मचाऱयाला त्याच्या बॉसने थेट 45 लाखांची मर्सिडीज भेट म्हणून दिली आहे.

केरळचे बिझनेसमन ए. के. शाजी यांनी कंपनीत काम करणाऱयाला महागडं आणि खास गिफ्ट दिले आहे. शाजी हे एका रिटेल आऊटलेट चेनचे मालक आहेत. केरळमध्ये त्यांचे 100 हून अधिक स्टोअर आहेत. त्यांनी सीआर अनिश याला आलिशान गाडी दिली आहे. याबाबत शाजी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्टदेखील लिहिली.

‘प्रिय अनि, गेल्या 22 वर्षांपासून तू माझ्यासाठी एक मजबूत आधारस्तंभ राहिला आहेस. तुला ही नवीन क्रूझिंग पार्टनर आवडेल अशी आशा आहे’ अशी भावनिक पोस्ट शाजी यांनी केली आहे. कंपनीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अनिशला हा सुखद धक्का त्याच्या मालकांनी दिला. एवढे मोठे गिफ्ट बघून अनिश भावुक झाला. ‘‘सर्वांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं आहे. मी आशा करतो की, भविष्यातसुद्धा आपण सोबत राहू,’’ असं अनिश यांनी म्हटलं आहे.