
सामना ऑनलाईन, चेन्नई
बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनसह 8 जणांवर चेन्नईमधील आर. मुरलीधरन या व्यापाऱ्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीचे हे प्रकरण एका प्रसिद्ध ब्रॅण्डच्या मार्केटिंगशी संबंधित आहे.याबाबत मुरलीधरन म्हणाले की, गुरग्रामच्या एका कंपनीने त्यांना हृतिकच्या एचआरएक्स या ब्रॅण्डच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी स्टॉकिस्ट म्हणून नेमले होते. मात्र हृतिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे मला 21 लाखांचे नुकसान सोसावे लागले.
सुझान आणि हृतिकचं नक्की चाललंय तरी काय?
कंपनीने वेळेवर उत्पादनाचा पुरवठा केला नाही. तसेच कोणतीही पूर्वकल्पना न देताच मार्केटिंग टीमचे काम बंद केले, असा आरोप मुरलीधरन यांनी केला आहे. मात्र ब्रॅण्डच्या काही उत्पादनांचा पुरवठा करण्याची जबाबदारी दिल्ली आणि मुंबईच्या इतर कंपन्यांवर टाकली होती असे हृतिकने म्हटले आहे.
























































