इथे वाढदिवसाला फुग्यांऐवजी वापरतात ‘कंडोम’, हेअर बँड म्हणूनही होतो उपयोग

90

सामना ऑनलाईन । हवाना

कंडोमचा वापर हा सुरक्षित सेक्ससाठी केला जातो परंतू सध्या क्यूबामध्ये एक वेगळ्याच पद्धतीने कंडोमचा वापर केला जात आहे. क्यूबामध्ये शतकापासूनच्या चालू असलेल्या अमेरिकन प्रतिबंधामुळे आणि सोव्हिएत मॉडेलच्या केंद्रीयकृत आर्थिक व्यवस्थेच्या कारणांमुळे क्यूबाच्या दुकांनामध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूचा अभाव आहे. मूलभूत वस्तूच्या कमतरतेमुळे त्यांनी कंडोम पासून रोजच्या वापराच्या वस्तू बनवण्यास सुरुवात केली आहे. केसांचे रबर, फुगे, पाण्यावर तरंगणारे फ्लोट या वस्तूंसाठी कंडोमचा वापर केला जातो.

हवानाच्या हेअर ड्रेसर सॅंड्रा हरनॅडीज यांनी सांगितलं की, आम्ही या कंडोमचा वापर उपकरणाच्या कमतरतेमुळे करतो. तसंच इथ येणाऱ्या ग्राहकांना वस्तूंच्या कमतरतेमुळे आम्ही निराश करू शकत नाही. यामुळे आम्हाला नाईलाजाने केसाच्या रबर बॅन्डसाठी कंडोमचा वापर करावा लागतो. तसेच लहान मुलं वाढदिवसाच्या सजावटीसाठी कंडोमचे फुगे बनवून ते उडवतात. समुद्र किनारी वापरले जाणारे फ्लोट यांना बाधण्यासाठी तसेच मासे पकडण्यासाठी देखील आता कंडोमचा वापर केला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या