
सामना ऑनलाईन । जयपूर
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजप नेते कार्यकर्त्यांकडून तसेच सोशल मीडियावरून अनेकदा पप्पू म्हणून हिणवले जाते. मात्र राहुल गांधींना अशा प्रकारे पप्पू म्हणणे एका भाजप खासदाराला चांगलेच महागात पडले आहे. प्रचारादरम्यान, राहुल गांधींना पप्पू म्हणटल्याने काँग्रेसच्या एका नगरसेविकेने सगळ्यांदेखत त्या खासदाराला कडक शब्दात जाब विचारला आणि त्यांची पंचाईत झाली. त्यांनी महिला नगरसेविकेला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र तिने चारचौघात झापल्याने भाजप खासदारचीच बेअब्रू झाली.
पाहा व्हिडीओ
#WATCH Congress Councillor Sita Damor confronts BJP MP Devajibhai over him allegedly calling Rahul Gandhi ‘pappu’ in Banswara, Rajasthan. Sita Damor says, “He said ‘Pappu ko bulao,pappu gaddhe bharega’. It’s wrong, so I objected. How can he call our Rahul Gandhi ‘pappu’.” (02.12) pic.twitter.com/BMfrVCMPrb
— ANI (@ANI) December 3, 2018
विधानसभा निवडणुकांची धामधूम सध्या सुरू असून कोणत्याही थराला जाऊन उमेदवाराचा प्रचार केला जात आहे. राजस्थानच्या बंसवाडा भागात भाजपचे खासदार देवाजीभाई आपल्या उमेदावाराचा प्रचार करत होते. प्रचारफेरी दरम्यान एका घरात बैठक सुरू होती. यावेळी देवजीभाई यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख पप्पू असा केला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या नगरसेविका सीता दामोर या संतापल्या. त्यांनी कडक शब्दात खासदाराला जाब विचारला की, ‘तुम्ही राहुल गांधींना पप्पू कसे काय म्हणाला?’, त्यावर खासदार देवजीभाई उत्तरले की, ‘सगळे म्हणतात म्हणून मी म्हणालो’. मात्र त्यांच्या उर्मट उत्तरामुळे नगरसेविका आणखी खवळली. ‘सगळे खड्ड्यात पडले म्हणून तुम्ही खड्ड्यात पडाल का?’ असा सवाल तिने केल्यानंतर खासदार ‘नाही’ म्हणाले आणि त्यांची बोलती बंद झाली. त्यांनी नगरसेविकेला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर आम्ही पंतप्रधान मोदींना सन्मान देतो, मग तुम्ही सर्वांना सन्मान का देत नाहीत? असा सवाल केला. नगरसेविकेची आक्रमकता पाहून भाजपचा प्रचार करणारे सारेच अडचणीत आले होते. मात्र तिच्या तोंडून मोदींविषयी सन्मानाचे वाक्य ऐकल्यानंतर भाजपच्या एका प्रचारक महिलेने नरेंद्र मोदी झिंदाबादच्या घोषणा देत नगरसेविकेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपच खासदार आणि प्रचारकांवर सोशल मीडियातून टीका होत आहे.






















































