
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
राज्यात काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आले असून, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या निक्रियतेमुळे काँग्रेस पक्ष डबघाईला आला आहे. गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या अनेक नेते मंडळींनी भाजपमध्ये प्रकेश केला आहे. चक्हाण यांनीच काँग्रेस भाजपच्या दाकणीला बांधला असल्याचा खळबळजनक आरोप एमआयएम आमदार आणि वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी केला.
इम्तियाज जलील यांना संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या 3 एप्रिल रोजी आमदार जलील हे भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, लोकसभा निकडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच काँग्रेसमध्ये गळती सुरू झालेली होती. विरोधी पक्षनेत्यांच्या मुलानेच पक्ष सोडला, तर नारायण राणे हे भाजपचे असताना त्यांचा मुलगा मात्र काँग्रेसचा आमदार आहे. काँग्रेस नेत्यांचे दुटप्पी धोरण हे समजण्या पलीकडचे आहे असेही जलील यांनी सांगितले.
मुकाबला शिवसेनेसोबतच!
लोकसभेची निवडणूक ही जाती, धर्मावर न लढवता विकासाच्या मुद्दय़ावर लढवली गेली पाहिजे, असे मतही मांडून त्यांनी दावा केला की, आगामी लोकसभेची निवडणूक एमआयएम आणि शिवसेनेतच होणार आहे. आपल्या आमदारकीच्या चार कर्षांच्या काळात कटकटगेट येथील गेटचे काम पूर्ण केले, तसेच बारापुल्ला गेटचेही काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी भाजपने निधी उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख त्यांनी पत्रकार परिषदेत केला.





























































