
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे पुढील महिन्यात 9 डिसेंबरपासून विदेश दौऱयावर जाणार आहेत. राहुल गांधी हे चार देशांच्या दौऱयावर जाणार असून यात सिंगापूर, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशांचा समावेश असणार आहे. विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडल्यानंतर 9 डिसेंबरपासून राहुल गांधी हे विदेश दौऱयावर जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. राहुल गांधी हे सिंगापूर आणि मलेशियामधील मूळच्या हिंदुस्थानी नागरिकांना भेटणार आहेत.

























































