Lok Sabha 2019 संभाजीनगरमधून उमेदवारी न मिळाल्याने आमदार अब्दुल सत्तारांचा पक्षाला राम राम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. तसेच “मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही, पण लोकशाहीने लढण्याचा अधिकार सर्वांना दिला आहे. आता माझा काँग्रेससोबत संबध नाही. मी अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढविणार” असे वक्तव्य त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केले.

संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांनतर अवघ्या 8 तासातच काँग्रेस पक्षातील वाद उफाळून आला. जिल्हाध्यक्ष आमदार सत्तार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मी यापूर्वीच आमदारकीचा व जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे नव्याने राजीनामा देण्याची गरज नाही. आगामी लोकसभा निवडणूक मी अपक्ष म्हणून लढणार आहे.” आपण नाराज आहात का? अशी विचारणा केली असता, “मी कोणावरच नाराज नाही. लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.