
सामना ऑनलाईन । मुंबई
काँग्रेस राष्ट्रावदी आघाडीने जागावाटप जाहीर केली असून काँग्रेसला 26 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 22 जागा आल्या आहेत. मुंबईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत हे जागावाटप जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीची संयुक्त पत्रकार परिषद दि.२३ मार्च रोजी संपन्न झाली.आगामी निवडणुकांचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे.यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी २६-२२ जागांवर लढणार आहेत.#MahaAghadi@NCPspeaks @PTI_News @ANI pic.twitter.com/OvGkl5KmD3
— Nawab Malik (@nawabmalikncp) March 23, 2019
काँग्रेसला 26 जागा मिळाल्या असून बहुजन विकास आघाडी व युवा स्वाभिमानी पक्षाला प्रत्येकी एक जागा सोडण्यात आली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा मिळाल्या आहेत. जागावाटप होण्यापूर्वी काँग्रेसने महाराष्ट्रातील 12 उमेदवारांची घोषणा केली होती, तर राष्ट्रवादीनेही 11 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.


























































