काँग्रेसच्या आंदोलनाचा लोकांना ताण, मोर्चास्थळी केली घाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसाद नायगावकर । यवतमाळ

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसने विधानपरिषदेचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढला. या मोर्चाची सुरुवात यवतमाळच्या शिवाजीनगर ग्राऊंडवरुन झाली. मोर्चासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची नाष्ट्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ग्राउंडवर करण्यात आली होती. परंतु कार्यकर्त्यांनी खाणे होताच खाण्याच्या थर्माकोल च्या डिशेश आणि पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बॅग ग्राउंडवरच फेकून दिल्याचे निदर्शनास आलेल्या संताप व्यक्त होत आहे.

मोर्चासाठी वापरण्यात आलेले हे पटांगण मध्यवस्तीत आहे. या मोकळ्या पटांगणात सकाळ-संध्याकाळ मैदानी खेळ खेळले जातात. मैदानाच्या सर्व किनाऱ्यावर जोगिंग ट्रॅक बांधला आहे. सकाळ- संध्याकाळी जॉगिंगसाठी येथे लोकांची गर्दी असते. या मैदानात ओपन जीमही आहे. हे सर्व दिसत असतानाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मैदानात सर्वत्र घाण करुन ठेवली आणि ते उचलण्याचे कष्ट सुद्धा घेतले नाही. यामुळे नागरिकांमध्ये तिव्र नाराजीचा सुर उमटत आहे. लोकशाहीत मोर्चा काढुन सरकारी धोरणांचा विरोध करणे ही लोकतांत्रिक परंपरा आहे. पण अशा प्रकारची घाण करुन लोकांच्या आरोग्याशी खेळ कसा करु शकते हा प्रश्न उपस्थित होत आहे.