काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पत्नीला ईडीची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्ली Š काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद या सक्तवसुली संचालनालय (ईडी) च्या रडारवर आल्या आहेत. ईडीने शनिवारी त्यांना नोटीस जारी केली असून 15 फेब्रुवारीला लखनऊ येथील ईडी कार्यालयात चौकशीला बोलावले आहे. लुईस खुर्शीद या डॉ. झाकीर हुसैन मेमोरियल ट्रस्टच्या प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत. दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये अफरातफर केल्याच्या आरोपप्रकरणी लुईस यांची चौकशी केली जाणार आहे.

 काँग्रेस आमदाराच्या घरी ईडीचे छापे

सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने शनिवारी कर्नाटकच्या बल्लारी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार नारा भरत रेड्डी यांच्याविरोधात कारवाई केली. ईडीने रेड्डी यांच्या वेगवेगळय़ा सहा ठिकाणी छापेमारी केली. बल्लारी आणि बंगळुरू येथील आमदाराचे घर, चेन्नई येथील एक ऑफीस, वडील सूर्य नारायण रेड्डी, भरत रेड्डी यांचे काका प्रताप रेड्डी यांचे घर, नातेवाईक सतीश रेड्डी आणि कार्यालयातही ईडी अधिकाऱयांनी झाडाझडती घेतली.