काँग्रेसचा आरोप – PM मोदींसोबत चालणाऱ्या CM शिवराज सिंह यांना बॉडीगार्डने रोखलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-cm-chauhan

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पूर्वांचल एक्सप्रेस-वे वर पायी चालतानाच्या व्हिडीओनंतर आता विरोधीपक्षांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काँग्रेसने व्हिडीओ शेअर करत प्रश्न विचारला आहे की, ‘एका राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत असं वर्तन शोभतं का?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. भोपळमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक बडे मंत्री उपस्थित होते. पंतप्रधान मोदी तिथलं प्रदर्शन पाहण्यासाठी पोहोचले. तेव्हा नरेंद्र मोदी यांच्यासोबत चालणाऱ्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना एका बॉडीगार्डने मागे होण्यास सांगितलं, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्री असूनही त्यांना रोखण्यात आलं, असं वर्तन चुकीचं असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.