कालुस्ते येथील श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना, खासदार विनायक राऊत यांची उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण तालुक्यातील कालुस्ते गावातील मधलीवाडी [तीनभाई] जय श्रीराम हनुमान सेवा मंडळ यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या नवीन श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन कदम, चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, रत्नागिरी विधानसभा संपर्क प्रमुख आणि ऐरोली विधानसभा उपशहर प्रमुख मंगेश साळवी, सरपंच रामकृष्ण कदम, उपसरपंच सुरज कदम, दिलीप कदम, साहिल कदम, महिपत कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.