
मोठय़ा ब्रँडचे शूज खरेदी केल्यानंतर ते अवघ्या महिन्याभरात खराब झाले. हे प्रकरण ग्राहक मंचाकडे गेल्यानंतर कंपनीला शूजचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश ग्राहक आयोगाने दिले आहेत.
पंचकुला येथील रहिवासी अजय मलिस यांनी 30 ऑगस्ट 2020 मध्ये चंदिगडच्या एका मॉलमधून शूज खरेदी केले. या शूजची किंमत 12 हजार 999 रुपये होती; परंतु 50 टक्के डिस्काउंटमुळे त्यांना 6 हजार 499 रुपयांना हे शूज मिळाले. मात्र अवघ्या एका महिन्यात हे शूज खराब झाले. अजय मलिक यांनी स्टोअरमध्ये जाऊन तक्रार केल्यानंतर कंपनीने शूज बदलून दिले नव्हते.
जर शूजमध्ये दोष नव्हता तर कंपनीने ग्राहकाचा क्लेम मंजूर करून एक्सचेंज फॉर्मवर स्वाक्षरी का घेतली? जर ग्राहक मोठय़ा ब्रँडसाठी मोठी रक्कम मोजतो तर त्याला प्रोडक्टही चांगले द्यायला हवे. ग्राहकाला शूजची किंमत 6 हजार 499 रुपये खरेदी केल्याच्या तारखेपासून 6 टक्के वार्षिक व्याजासह परत करावी. तसेच ग्राहकाला मानसिक त्रास आणि न्यायालयीन खर्चापोटी 10 हजार रुपये द्यावेत, असे ग्राहक मंचाने निर्देश दिले.




























































