
सामना प्रतिनिधी । परभणी
महातिवरणची दरसुचि आणि बाजारभावातील दर यात जवळपास ३० टक्के तफावत आहे. दरसुचीमधील तफावतीमुळे आणि निविदा प्रक्रीयेमधील जाचक अटीमुळे महावितरणच्या परभणी वीज कंत्राटदार असोसिएशनने निविदांवर बहिष्कार टाकला आहे.
शासन निर्णयाप्रमाणे महावितरण मार्फत कृषी पंपांना उच्च दाबाने आणि मिटर लावून वीज पुरवठा करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. ६० कोटी रुपयांच्या परभणी जिल्ह्यातील निविदा काढण्याच्या प्रक्रीयेस प्रारंभ झाला असताना माहावितरणची दरसुची व बाजारभावात ३० टक्के तफावत आहे. दरसुचीमधील तफावतीमुळे आणि निविदा प्रक्रीयेमधील जाचक अटीमुळे परभणी जिल्ह्यातील सर्व विद्युत ठेकेदारांनी काम करण्यास असमर्थता दर्शवत निविदा प्रक्रीयेवर बहिष्कार टाकला आहे.
परभणी विद्युत संघटना ही फेडरेशन ऑफ इलेक्टिकल्स कॉन्ट्रॅक्टर असो. ऑफ महाराष्ट्र (फेकाम)यांच्याशी संलग्न संघटना आहे. या बहिष्कारामुळे ६० कोटींची निवीदा प्रक्रीयेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यातील सर्व विद्युत ठेकेदार यांनी एकत्र येऊन हा बहिष्कार टाकला आहे. यात आर.डी. मगर, आयुब भाई, सोमनाथ सोन्नेकर, मिलींद देशपांडे, कैलास तिथे, हरिप्रसाद मिश्रा, अब्दुल मतीन, योगेश मुळी, प्रताप पवार, श्याम दरक, सचिन तोष्णिवाल, अखील इनामदार, वसीम इमानदार, एस.एस. चव्हाण, खराबे पाटील, श्रीकांत बोराडे, दत्ता बडे, राजेश नांदगावकर, शेख साबेर आदी सहभागी झाले आहेत.

































































