
राज्य आणि मुंबईत कोरोनाविरोधात राबविण्यात आलेल्या मोहिमांमुळे गेल्या काही दिवसांत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात घटले आहे. राज्यात आज 35 जणांचा मृत्यू झाला तर मुंबईत एका ज्येष्ठ महिलेसह तिघी जणींचा मृत्यू झाला. त्यापैकी दोघींना दीर्घकालीन आजार होते. राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 94 टक्के तर मुंबईत हे प्रमाण 93 टक्के इतके मोठे आहे.
कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत रविवारी दिवसभरात 581 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 697 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 356 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत आज 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 135 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 75 हजार 464 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 771 वर पोहोचली आहे.
राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण 94 टक्क्यांवर
राज्यात आज दिवसभरात 2 हजार 64 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.59 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 282 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, राज्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण घटले असून आज दिवसभरात 35 जणांचा मृत्यू झाला तर मृत्युदर 2.56 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 29 लाख 58 हजार 502 चाचण्या झाल्या असून 19 लाख 42 हजार 136 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 972 जण होम क्वारंटाइन असून 2 हजार 969 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.




























































