#corona सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविषयी सोशल मीडीयाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची अनधिकृत माहिती प्रसारीत केल्यास अशा व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यापूर्वी अशा प्रकारे खोटी माहिती प्रसारीत केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती व अफवा पसरवत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशाप्रकारे जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांच्या नावाने एक मॅसेज समाज माध्यमांमध्ये फिरत आहे. सदर मॅसेज कोणही फॉरवर्ड करू नेय.

तो मॅसेज जिल्हा माहिती कार्यालयाचा नाही
समाज माध्यमांवर सध्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्गच्या नावाने व्हॉट्सअपवर कोरोना संदर्भात पोस्ट फिरत आहे. अशी कोणहीती पोस्ट जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आली नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी दिले आहे. हीच पोस्ट विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकारी यांच्या नावाने फिरत आहे. अशा प्रकारच्या पोस्ट पसरवणाऱ्यांवर राज्याच्या विविध भागात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी कोरोना संदर्भात कोणत्याही पोस्ट फॉर्वर्ड करू नयेत.