कोरोनाग्रस्तावर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाच झाली लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरलाच कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या डॉक्टरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. हा डॉक्टर लखनौमधील किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठात काम करत होता.

‘या डॉक्टरचे तसेच त्याच्या 14 सहकाऱ्यांच्या तपासण्या केल्या असून त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. ज्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे त्याने अनेक रुग्णांच्य़आ तपासण्या केल्या आहेत’, असे रुग्णालयाचे प्रवक्ते डॉ. सुधीर सिंग यांनी सांगितले. डॉक्टरला कोरोनाची लागण होण्याची उत्तर प्रदेशमधील ही पहिली घटना आहे.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील कलबुर्गी येथील एका 76 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तो हिंदुस्थानातील पहिला कोरोनाचा मृत्यू ठरला. त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्या डॉक्टरला व त्याच्या कुटुंबीयांना विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं.

कोरोनाचा धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा कोरोनानेच मृत्यू
चीनमध्ये हजारो नागरिकांचे बळी घेणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या धोक्याबाबत जगाला सर्वप्रथम सांगणाऱ्या डॉक्टरचाच काही दिवसांपूर्वी करुण अंत झाला.. ली वेनलियांग असे या 34 वर्षीय डॉक्टरचे नाव होतं. डिसेंबरमध्ये वुहानला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्याबाबतचा अहवाल वेनलियांग यांनी मेडिकल स्कूलच्या ग्रुपला दिला होता. या आजारापासून सर्वांना सावध करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. काही तासांतच त्यांचे हे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. त्यावेळी अफवा पसरविल्याचा आरोप पोलिसांकडून वेनलियांगवर ठेवण्यात आला होता.