
जगभरात 75 हजार 536 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांत 14 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा वेळी कुठल्या रक्तगटाच्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे हे संशोधकांनी शोधून काढले आहे. तसेच कुठल्या रक्तगटाच्या लोकांना या विषाणूचा धोका कमी आहे हे शोधून काढण्यातही संशोधकांना यश आले आहे.
डेली मेल या ब्रिटिश वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे. चीनमधील हुबेई प्रांतातील जिनइंतान इस्पितळातील संशोधकांनी खुलासा केला आहे की ब्लड ग्रूप ए (Blood Group A) असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना लवकर संक्रमित होऊ शकतो. तर ज्यांच्या ब्लड ग्रूप ओ (Blood Group O) असतो त्यांच्यात कोरोना संक्रमित व्हायला वेळ लागतो.
वुहानमध्ये वैज्ञानिकांनी कोरोना संक्रमित असलेल्ल्या 2 हजार 173 जणांचा अभ्यास केला आहे. या रुग्णांपैकी 206 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 206 पैकी 85 रुग्णांचा ब्लड ग्रूप ए (Blood Group A) होता म्हणजेच 41 टक्के रुग्णांचा ब्लड ग्रूप ए होता. तर 52 लोकांचा ब्लड ग्रूप ओ (Blood Group O) होता. त्यांचे प्रमाण 25 टक्के इतके होते.
2 हजार 173 रुग्णांमध्ये 38 टक्के रुग्णांचा ब्लडग्रुप ए होता. तर 26 टक्के रुग्णांचा ब्लड ग्रूप ओ होता. संशोधनातील रुग्णांमध्ये ए ब्लड ग्रूप असणारे रुग्ण 38 टक्के होते. तर 26 टके रुग्ण ज्यांना कोरोनाची लागण झाली होती ते ओ ब्लडग्रुपचे होते. संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण ओ पेक्षा ए ब्लड ग्रुपचे जास्त आहे. तर ए ब्लड ग्रूप असणार्या रुग्णांची संख्या कमी आहे.
जेव्हा सार्स-सीओवी-2 हा व्हायरस पसरला होता तेव्हा ब्लड ग्रूप ओ (Blood Group O) असलेल्यी व्यक्ती कमी आजारी पडले होते. तर इतर ब्लड ग्रूप असलेल्या सर्वाधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली होती.
असे असले तरी या संशोधनाचा रिव्ह्यू झालेला नाही परंतु या संशोधनामुळे कोरोनाची लस शोधण्यासाठी मदत होईल असा अंदाज वैज्ञानिक गाओ यिंगदाई यांनी केला आहे. तसेच ज्यांचा ब्लड ग्रूप ए (Blood Group A)आहे त्यांनी घाबरण्याचे कारण नाही असे गाओ यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्यांचा ब्लड ग्रूप ओ (Blood Group O) आहे त्यांनीही निश्चिंत राहिले पाहिजे असे नाही. जर जास्त लोकांवर असे संशोधन केले तर योग्य निष्कर्ष निघू शकतात असे संशोधकांनी म्हटले आहे.































































