कोरोना विरोधातील लढ्यासाठी सचिन तेंडुलकरची 50 लाखांची मदत

1547

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कोरोना व्हायरसविरोधातील लढ्यासाठी 50 लाख रुपयांची मदत केली आहे. सचिनने 25 लाख रुपये पंतप्रधान रिलीफ फंडला तर 25 लाख मुख्यमंत्री रिलीफ फंडाला दिले आहेत. देशभरातील खेळाडूंकडून झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी मदत आहेत. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

याआधी इरफान पठाण व त्याचा भाऊ युसुफ पठानने वडोदरा मधील पोलीस स्थानकांमध्ये चार हजार मास्क वाटले होते. तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुण्यातील एका एनजीओला एक लाख रुपयांची मदत केली होती.

सचिन तेंडुलकरने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करत लोकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन केले होते. सचिन सोबत विराट कोहली, अनुष्का शर्मा, सानिया मिर्झा यांनी देखील कोरोना व्हायरसबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या