
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करणे मोठ्या जिकिरीचे होऊन जाते. लाखांमध्ये येणाऱ्या बिलाची चिंता कोरोनाबाधित रुग्णांना सतावते. हाच मुद्दा लक्षात घेत मंगलमर्ती लेन विरार (पश्चिम) येथील ‘निःस्वार्थ’ हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. महाबली सिंग आणि त्यांची पत्नी डॉ. ज्योती सिंग यांनी कमीत कमी बिलात कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला.
डॉ सिंह यांनी वीस ते पन्नास हजार रुपयांत रुग्णांचे उपचार सुरू केले. डॉ. महाबली सिंग यांनी आपले निःस्वार्थ हॉस्पिटल आणि स्टार हॉस्पिटल मनपा आयुक्त यांना सांगून एप्रिल महिन्यांच्या सुरवातीपासूनच कोविड सेंटर बनवले होते. डॉक्टर महाबली सिंग आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपलं तिसरं लाईफ केअर हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी वापरण्यात येणारे पीपीई किट आणि त्यांच्या उपचारादरम्यान येणाऱ्या डॉक्टरांचे व्हिजिट मोफत केले आहे.






























































