कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ब्रिटनमध्ये तीन आठवडे लॉक डाऊन!

502

ब्रिटनमध्ये कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी तीन आठवड्यांच्या लॉक डाऊनची घोषणा केली आहे. लोकांना घराबाहेर पडण्यावर तीन महिने कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनामुळे ब्रिटनमध्ये 335 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कठेर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कोणत्याही पंतप्रधानाला देशातील जनतेवर कठोर निर्बंध लादण्याची इच्छा नसते. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे नागरिकांनी एकत्र येऊ नये, यासाठी कठोर निर्बंध लादणे, ही काळाची गरज असल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे.

तीन आठवड्यांच्या या लॉक डाऊनच्या काळात जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी, वैद्यकीय सेवेसाठी किंवा ज्यांचे काम घरून शक्य नाही, अशा व्यक्तींनाच घराबाहेर पडण्याची परवानगी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या तीन आठवड्यांच्या काळात तुम्ही कोणालाही भेटायला जाऊ नका किंवा कोणलाही भेटायला बोलावू नका, असे आवाहनही त्यांनी केले. या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्विटर अकाऊंटवर आपल्या नावासोबत #StayHomeSaveLives जोडले आहे.

पंतप्रधान जॉन्सन यांची प्रकृती उत्तम आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे जॉन्सन संक्रमित झाल्यास किंवा ते आजारी पडल्यास परराष्ट्रमंत्री डोमॅनिक राब सरकारची जबाबदारी सांभाळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या ब्रिटनमध्ये झपाट्याने वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या