
दिल्लीच्या रोहीणी कोर्टात दोन वकिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. पोलिसांनी दोन्ही वकिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला वकिलाने पुरुष वकिलाविरोधात पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. ज्यामध्ये त्यांनी गंभीर आरोप लावले आहेत. पुरुष वकिलाचे नाव विष्णू कुमार शर्मा असल्याचे बोलले जात आहे. महिलेने त्याच्यावर उत्पीडन, शारीरीक हिंसा आणि घाबरवणे-धमकावल्याचे आरोप केले आहेत. ही घटना 18 मे रोजी घडली आहे. ज्यावेळी रोहीणी कोर्ट नंबर-113 च्या समोर पिडीत महिला उभी होती. अशातच तिथे विष्णू शर्मा या वकिलाने तिला मारहाण करायला सुरुवात केली. महिला वकिलाने सांगितले की, ती न्यायासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावणार.
Kalesh B/w Gents Lawyer and Lady Lawyer inside Rohini Court Delhipic.twitter.com/qU93BfpSiE
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 19, 2023
याप्रकरमी एका वरिष्ट पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर घटनेचा तपास सुरु आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, विष्णु शर्माने तिला पकडून ठेवल्याने ती त्याच्या तावडीतून स्वताला सोडविण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर शर्माने तिला प्रचंड मारलं, त्यामुळे चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमा झाल्या आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओबाबत पोलिसांना मिळाला असून याप्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्यो दोषी असलेल्यावर कारवाई कऱम्यात येईल, . अशाप्रकारचा हा पहिलाच व्हिडीओ नसून याआधीही कोर्ट परिसरात अशाप्रकारचे व्हिडीओ समोर आले आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
























































