
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
नियमबाह्य गर्भपात करणाऱ्या डॉ. अरुणा गोविंद राजपूत हिचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी नामंजूर केला.
सिल्लोड येथील रघुनाथ गाडेकर (५५) व भिकाबाई गाडेकर (४७) यांना एक मुलगा क एक मुलगी अशी दोन अपत्ये असताना भिकाबाईला तिसऱ्यांदा गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजपूत हॉस्पिटलमधील डॉ. अरुणा राजपूत हिने नियमबाहय़ गर्भपात करून देण्यासाठी आधी २५ हजार रुपये व नंतर १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर २ जून २०१८ रोजी राजपूत हॉस्पिटलमध्ये १५ हजार रुपये जमा करून भिकाबाई गाडेकर हिला दाखल करण्यात आले व त्याच दिकशी तिचा गर्भपात करण्यात आला. गर्भपात करून एका प्लास्टिकच्या पिशवीत मृत अर्भक रघुनाथ गाडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. हे मृत अर्भक रघुनाथ याने केळगाव परिसरातील शेतामध्ये जमिनीत पुरल्याचे निष्पन्न झाले. भागीनाथ सांडू वाघ यांच्या तक्रारीवरून रघुनाथ गाडेकर, भिकाबाई गाडेकर, डॉ. अरुणा राजपूत व डॉ. गोकिंद राजपूत या चौघा जणांविरोधात भादंवि ३१५, ३१८, ३४ सह पीसीपीएनडीटी कायद्याच्या २३, १ कलमांन्वये सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीसीपीएनडीटी कायद्यान्वये २०११ मध्येही डॉ. अरुणा राजपूत हिचे सोनोग्राफी मशीन सील करण्यात आले होते. करील संबंधित प्रकरणात डॉ. अरुणा हिने पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कापरल्याचे दिसून आले आहे क याच पोर्टेबल उपकरणाच्या साहय़ाने अनेक गर्भपात केले असावेत, या दृष्टीनेही तपास केला जाणार आहे. आरोपी डॉ. अरुणाच्या अटकपूर्क जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपी डॉक्टरचे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करणे बाकी असून, या पोर्टेबल मशीनच्या साहय़ाने इतर महिलांचे गर्भपात केले आहेत का, याचाही तपास करावयाचा आहे. हे प्रकरण गंभीर असून तपासासाठी आरोपीच्या अटकेची गरज आहे. त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहायक सरकारी ककील सुदेश शिरसाट यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने विनंती मान्य करून डॉ. अरुणा राजपूत हिचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.




























































