हिंदुस्थानच्या संघात मुंबईची त्रिमूर्ती; 19 वर्षांखालील वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर

413

दक्षिण आफ्रिकेमध्ये पुढल्या वर्षी 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होणाऱया 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी हिंदुस्थानच्या ज्युनियर राष्ट्रीय निवड समितीने सोमवारी युवा संघाची घोषणा केली. मुंबईच्या तीन खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यशस्वी जैसवाल, दिव्यांश सक्सेना व अथर्व अंकोलेकर या तीन मुंबईकरांची प्रतिष्ठsच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. प्रियम गर्गकडे युवा टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे.

16 संघांचा चार गटांमध्ये समावेश

दक्षिण आफ्रिकेत होणाऱया वर्ल्ड कपमध्ये 16 संघांचा समावेश करण्यात आला आहे. या संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटात चार संघांचा समावेश असणार आहे. गटातील सर्वोत्तम दोन संघ सुपर लीग या पुढील फेरीसाठी पात्र ठरतील.

चार वेळच्या जगज्जेत्यांचा मार्ग सोप्पा

हिंदुस्थानने या स्पर्धेचे चार वेळा जेतेपद पटकावले आहे. सर्वाधिक जेतेपद हिंदुस्थानच्याच नावावर आहे. हिंदुस्थानचा या स्पर्धेतील साखळी फेरीचा मार्ग सोप्पा आहे. ‘अ’ गटात समावेश असलेल्या या संघाला जपान, श्रीलंका व न्यूझीलंड या देशांचा सामना करावयाचा आहे.

हिंदुस्थानचा चमू; दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयासाठी

यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव जुरेल (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील, सीटीएल रक्षण.

19 वर्षांखालील वर्ल्ड कपसाठी

यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव जुरेल (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील.

आपली प्रतिक्रिया द्या