
रशियामध्ये आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका मातेने आपली सुंदर दिसण्याची हौस भागविण्यासाठी चक्क आपल्या पाच दिवसाच्या बाळाला विकण्याचे धाडस केले आहे आणि नंतर त्या मिळालेल्या पैशातून असे काम केले आहे ज्याने सगळेच हैराण झाले आहेत. याप्रकरणी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना रशियातील दगीस्तान येथील आहे. स्थानिक मिडीयाने या घटनेचा पर्दाफाश केला आहे. या महिलेने आपल्या पाच दिवसाच्या बाळाला 2 लाख 83 हजारांपेक्षा जास्त किंमतीत विकले. महिलेला ही रक्कम एकाचवेळी न देता सुरुवातील 25 हजार रुपये देण्यात आले होते. त्यानंतर पाच दिवसाचे बाळ ज्यांनी घेतले तिथे गेल्यावर ते आजारी पडले. त्यांनी महिलेकडे बाळाचे मेडीकल रिपोर्ट मागितले. त्यांना पुढच्या महिन्यात त्या महिलेला 1 लाख 29 हजार द्यायचे होते, ज्यातून ती महिला आपल्या नाकावर शस्त्रक्रिया करणार होती. दरम्यान बाळाची खरेदी करणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी अटक केले तेव्हा त्यांनी सगळी हकिकत समोर आली.
न्यूजफ्लॅशच्या वृत्तानुसार, रशियन फेडरेशनच्या तपास समितीने निवेदनात म्हंटले आहे की, आरोपी महिलेविरुद्ध क्रिमिनल केस दाखल केली आहे आणि घटनेचा तपास सुरु केला आहे. तपासानुसार 25 एप्रिल 2022 रोजी या महिलेने एका बाळाला जन्म दिला आणि 30 एप्रिलला तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी तिने आपल्या पाच दिवसाच्या बाळाला विकून रक्कमेचा पहिला हिस्सा घेतला होता. बाकीचे पैसे ती टप्प्याने घेणार होती मात्र पोलिसांनी महिलेचा डाव उधळला. आता या महिलेला मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक केली आहे. महिलेने आपल्या बाळाला विकून सुंदर बनायचे होते.


























































