क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली पावणेदोन लाखांना गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करीत कमी वेळत जास्त नफा कमवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने तरूणाला पावणेदोन लाखांचा गंडा घातला. ही घटना 15 फेब्रुवारीला ऑनलाईनरित्या हडपसरमध्ये घडली. याप्रकरणी 39 वर्षीय तरूणाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूण खासगी कंपनीत कामाला असून ऑनलाईनरित्या पैसे गुंतवणूकीवर माहिती घेत होता. त्यावेळी सायबर चोरट्याने त्यांना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करीत कमी वेळत जास्त नफा कमवून देण्याच्या आमिष दाखविले. त्याअनुषंगाने तरूणाने संबंधिताच्या बँकखात्यात पावणेदोन लाख रुपये ऑनलाईनरित्या वर्ग केले. मात्र, त्यांना जादा परतावा न देता सायबर चोरट्याने फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक गांधले तपास करीत आहेत.