
रास्ता पेठ परिसरातील होलसेल तीन दुकानामध्ये चोरी करून चोरट्यांनी 1 लाख 84 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 10 ते 11 फेब्रुवारीदरम्यान शामियाना कॉम्पेक्स माळी महाराज मठ रस्ता परिसरातील गणक एन एक्समध्ये घडली आहे .
फिर्यादी यांचे एनएक्स नावाने प्रोव्हिजन स्टोरअचे दुकान आहे. 10 ते 11 फेब्रुवारीला दुकान बंद असताना चोरट्यांनी 1 लाख 74 हजारांची रोकड चोरून नेली. त्याशिवाय किशोर खीमशेरा यांच्या सॅनिटरी वेअरच्या दुकानातून 1 हजार 600 रूपयांचा ऐवज चोरून नेला. महेंद्र माली यांच्या आईस्क्रीम दुकानातून 6 हजारांची रोकड चोरून नेली आहे. तिन्हीही दुकानातून चोरट्याने 1 लाख 83 हजारावर ऐवज चोरून नेला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.






























































