निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचे बनवले बोगस दस्तावेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या पत्नीचे बनावट दस्तावेज बनवल्याची घटना समोर आली आहे. ठगाने बनावट दस्तावेज बनवून बँक खाते तयार केले आहे. याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्या खारघर येथे राहतात. पूर्वी त्या नेहरूनगर येथे राहत होत्या. तक्रारदार यांची सर्व कागदपत्रे ही त्याच्या वडिलांकडे होती. सहा दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेने तक्रारदार यांच्या नावाने आधारकार्ड बनवले. त्यानंतर दुसऱया दिवशी तक्रारदार यांच्या नावाचे पॅनकार्डदेखील तक्रारदार यांच्या वडिलांच्या घरी आले. आधार कार्ड आणि पॅनकार्डमध्ये तक्रारदार यांचा फोटो होता, मात्र पत्ता आणि नाव वेगळे होते. त्याची दखल घेऊन तक्रारदार याने चेंबूर येथील बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा महिलेचे बनावट दस्तावेज वापरून बँक खाते उघडल्याचे समोर आले.