डहाणू अत्याचारातील फरार आरोपीच्या गुजरातमध्ये आवळल्या मुसक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डहाणूतील सख्ख्या बहिणींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीच्या पोलिसांनी गुजरातमध्ये मुसक्या आवळल्या आहेत. २२ वर्षीय आरोपी सैजान मुंशी हा भरूच शहरात लपून बसला होता. याची खबर लागताच पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरातमध्ये धडक देत त्याला बेड्या ठोकल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सैजान मुंशी याने लग्नाचे आमिष दाखवून दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. प्रेमाचा गैरफायदा घेत त्याने दोघी बहिणींवर लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडित मुलींचे अश्लील व्हिडीओ तयार करून त्याद्वारे त्यांना धमकावल्याचाही आरोप सैजान मुंशीवर आहे. पीडितांपैकी एक मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला. दरम्यान आरोपीचा शोध घेण्यासाठी पालघर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी विविध राज्यांमध्ये विशेष मोहीम राबवली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुजरातमधील भरूच येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयाने त्याला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.