मंदिरात चोरी करणारे गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चोरीच्या मोटारसायकलचा वापर करून मंदिरात चोऱया करणाऱया तिघांना दहिसर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. अबू खान, अर्जुन विश्वकर्मा, शाहिद अली शेख अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांच्या अटकेने सात गुह्यांची उकल करण्यात दहिसर पोलिसांना यश आले आहे. दहिसर पूर्व परिसरात असलेल्या साईबाबा मंदिरात गेल्या आठवडय़ात चोरटय़ांनी त्या मंदिरातील दानपेटी चोरून पळ काढला. चोरटे  हे दहिसरमध्ये फिरत असल्याची माहिती दहिसर पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्या तिघांनी गुह्याची कबुली दिली.