Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा 13 नोव्हेंबरसाठीचे भविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष: ( ARIES – Saturday,November 13, 2021)
नवीन ओळखी वाढतील. कुटुंबप्रमुखाकडून प्रेमाची भेट मिळण्याची शक्यता. दूरच्या प्रवासाचा बेत आखाल.

शुभरंग: गुलाबी

वृषभ : ( TAURUS – Saturday,November 13, 2021)
अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्याचा आजचा दिवस आहे. आरोग्य उत्तम राहिल. उधारीचे येणे वसूल कराल.

शुभरंग: हिरवा

मिथुन : ( GEMINI – Saturday,November 13, 2021)
आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबियांना त्रास होईल असे वागू नका. घरातल्यांची मर्जी सांभाळा. नवीन कार्याचे नियोजन करण्याची संधी मिळण्याची शक्यता

शुभरंग: केशरी

कर्क : ( CANCER – Saturday,November 13, 2021)
इतरांसोबत बोलताना मधुरावाणीचा वापर करा. रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल.

शुभरंग: पिवळा

सिंह : ( LEO – Saturday,November 13, 2021)
कुटुंबाकरता वेळ द्याल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. भटकंतीचा आनंद घ्याल.

शुभरंग : लाल

कन्या : ( VIRGO – Saturday,November 13, 2021)
आज दिवसभरात एखादी शुभवार्ता कानी पडण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहिल. हाती घेतलेले काम यशस्वीपणे पार पाडाल.

शुभरंग : चंदेरी

तूळः ( LIBRA – Saturday,November 13, 2021)
प्रिय व्यक्तीची अचानक भेट होईल. उत्साह वाढवणा-या घटना घडण्याची शक्यता. मित्रांचे सहकार्य मिळेल.

शुभरंग : नारंगी

वृश्चिक: ( SCORPIO – Saturday,November 13, 2021)
मन प्रसन्न राहिल अशा गोष्टी करण्यात वेळ घालवा. इतरांकडून फार अपेक्षा ठेवू नका. नोकरीत सहकारी सहकार्य करतील.

शुभरंग: मोरपिसी

धनु: ( SAGITTARIUS – Saturday,November 13, 2021)
जवळचा प्रवास कराल. आजचा दिवस व्यवसायात प्रगती करण्याचा आहे. काही जुने स्नेही, मित्रमंडळी भेटण्याची शक्यता.

शुभरंग : काळा

मकर: ( CAPRICORN – Saturday,November 13, 2021)
मनात येणा-या नकारात्मक विचारांना दूर करण्याचा प्रयत्न करा. तब्येतीकडे लक्ष द्या. वडीलधा-यांची सेवा करण्याची संधी मिळण्याची शक्यता.

शुभरंग : जांभळा

कुंभ : ( AQUARIUS – Saturday,November 13, 2021)
आजचा संपूर्ण दिवस उत्साहात आणि प्रसन्नतेत घालवाल. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

शुभरंग : पांढरा

मीन : ( PISCES – Saturday,November 13, 2021)
तब्येतीकडे लक्ष द्या. धार्मिक कार्याला हातभार लावाल. चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

शुभरंग: पोपटी