Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’12 ऑक्टोबर’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Wednesday, October 12, 2022)
गणपतीचा जप करा. गरिबांना मिठाई वाटा. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्याकडून कामाची अपेक्षा करतील. मन:शांतीकरिता प्रयत्न करा. मोठ्या व्यक्तिंसोबत जवळचे संबंध प्रस्थापित होतील. नव्या योजना राबवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोबाईल पाहण्यात वेळ घालवू नका. प्रिय व्यक्तिला भेटवस्तू देऊन खूश करा.
शुभरंग : खाकी

वृषभ (TAURUS – Wednesday, October 12, 2022)
तेल स्नान करा. मिळालेल्या संधीचे सोने कराल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नोकरी करणाऱ्यांनी तोंडावर ताबा ठेवा. तरुण-तरुणींसाठी आजचा दिवस सुंदर आहे. गणपती अथर्वशीर्ष वाचा किंवा त्याचे पारायण करा. प्रिय व्यक्तिसोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ काढाल. आवडत्या रंगाचा पोषाक परिधान करा.
शुभरंग : निळा

मिथुन (GEMINI – Wednesday, October 12, 2022)
माठातील पाणी प्या. खिशात तांब्याचा शिक्का ठेवा. कामावर लक्ष केंद्रित करा. जवळ आलेल्या सण-समारंभाचा आनंद घेण्यासाठी वेळ काढाल. श्रीरामाचे दर्शन घ्या. रामरक्षा वाचा. व्यवसायाकरिता आजचा दिवस फायदेशीर आहे. घरातील वातावरण प्रेमाने भरलेले राहिल. सकारात्मक राहा.
शुभरंग : मोरपिसी

कर्क (CANCER – Wednesday, October 12, 2022)
आर्थिक स्थिती कमकुवत असणाऱ्यांना कपड्याचे दान करा. पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही एखाद्या व्यक्तिला पाहताक्षणी प्रेमात पडण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाला यश मिळेल. नोकरीत अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी होतील. आराध्यदेवतेचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करा. छंद जोपासा.
शुभरंग : मोरपिसी

सिंह (LEO – Wednesday, October 12, 2022)
धार्मिक कार्यासाठी दानधर्म करा. जुने नातेसंबंधांचा उपयोग होईल. मारुतीस्तोत्र म्हणा. कामाकडे लक्ष द्या. आईवडिलांचे आशीर्वाद घ्या. मोकळ्या हवेत फिरायला जाल. अडलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागाल. अनावश्यक चिंता करू नका. आजचा दिवस कामात जाईल. घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. बदललेल्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
शुभरंग : पांढरा

कन्या (VIRGO – Wednesday, October 12, 2022)
अंघोळीच्या पाण्यात कापूर घाला. आवडत्या पुस्तकाचे वाचन कराल. अनोळखी व्यक्तिंवर विश्वास ठेवू नका. आजचा दिवस उत्साहात जाईल. कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. नवीन गुंतवणूक कराविशी वाटेल. मित्रमंडळींसोबत भरपूर वेळ घालवाल. प्रिय व्यक्तिची भेट होईल. सहकारी तुमच्या कामाचे कौतुक कराल.
शुभरंग : राखाडी

तूळ (TULA- Wednesday, October 12, 2022)
गणपतीच्या देवळात प्रसाद वाटा. आजचा दिवस इतरांना आनंद देणारा असेल. प्रवासात पाकिट सांभाळा. मिळालेल्या रिकाम्या वेळेचा योग्य सदुपयोग कराल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. मानसिक शांततेकडे लक्ष द्या. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. स्त्रियांनी आपल्या समस्या सामंजस्याने सोडवाव्यात.
शुभरंग : काळा

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, October 12, 2022)
प्रिय व्यक्तिला सुगंधित फुले भेट द्या. वजनवाढीकडे लक्ष ठेवावे लागेल. अतिखाण्यात आनंद मानू नका. कोणावरही सूड उगवड्याच्या भावनेने काही साध्य होणार नाही, हे लक्षात घ्या. मनावरचे दडपण जवळच्या मित्रमंडळींशी बोलल्याने दूर होईल. शांत डोक्याने विचार करा. भावना नेमक्या शब्दात व्यक्त करा. प्रवासाचा योग आहे.
शुभरंग : गुलाबी

धनु (SAGITTARIUS – Wednesday, October 12, 2022)
करमणुकीसाठी पैसे खर्च कराल. सौंदर्यप्रसाधनांच्या खरेदीवर अति खर्च करणे टाळा. सायंकाळी मौजमजेचा बेत आखाल. कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची गरज आहे. वेळेचा सदुपयोग करा. घरातील लहाना मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य लाभेल. सुवार्ता कानी येण्याची शक्यता आहे.
शुभरंग : खाकी

मकर (CAPRICORN -Wednesday, October 12, 2022)
तुमची समस्या योग्य व्यक्तिकडेच बोलून दाखवा. कुटुंबियांपासून दूर राहावे लागेल. सायंकाळी बागेत फिरायला जा. दररोज सकाळी अंघोळीनंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्या. घोरकष्टोद्धारण स्तोत्र म्हणा. प्रिय व्यक्तिला समजून घ्या. ज्येष्ठ व्यक्तिंचा आदर करा. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. देवळातील भटजींना सोवळे दान द्या.
शुभरंग : चिंतामणी

कुंभ (AQUARIUS – Wednesday, October 12, 2022)
कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या चांगल्या वागणुकीमुळे समाजात प्रिय व्हाल. मनोरंजनाचा लाभ घ्याल. हातून मोठ्या चुका घडण्याआधी वेळीच सावध व्हा. गुलाबाच्या फुलांचे रोपटे परसात लावा.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Wednesday, October 12, 2022)
समुद्रात नाण्यासोबत पांढरे फूल प्रवाहित करा. जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्याल. चिंता सोडून द्या. कुटुंबियांच्या गरजांकडे लक्ष द्यावे लागेल. महत्त्वाच्या व्यक्तिंशी चर्चा करताना सजग राहा. थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या. आरोग्याची काळजी घ्या. सकाळी उठल्यापासून उत्साहाने कामाला लागाल. कामातील अडथळे दूर होतील.
शुभरंग : लाल