Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’19 ऑक्टोबर’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Wednesday, October 19, 2022)
मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल. संवाद, संभाषण, चर्चा यामध्ये वेळ जाईल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. आवडत्या व्यक्तिची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवाल. कापूरमिश्रित पाण्याने आंघोळ करा.
शुभरंग : केशरी

वृषभ (TAURUS – Wednesday, October 19, 2022)
आहारात चण्यांचा समावेश करा. घरातील लहान मुलांसाठी वेळ काढा. रागावर नियंत्रण ठेवा. अचानक पैशाची आवश्यकता भासू शकते. बोलताना विचार करून बोला. अनळखी लोकांशी ओळख होईल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. सूर्यनमस्कार आणि योगासने करण्याला महत्त्व द्या. रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागाल.
शुभरंग : तांबडा

मिथुन (GEMINI – Wednesday, October 19, 2022)
पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा. मिळालेल्या प्रत्येक चांगल्या संधीचा फायदा घ्या. घरात आनंदाचे वातावरण ठेवा. अतिमधुर आवाजाच्या व्यक्तिशी भेट होण्याची शक्यता आहे. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे फायदा होईल. छानशी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. व्यर्थ खर्च करू नका.
शुभरंग : निळा

कर्क (CANCER -Wednesday, October 19, 2022)
प्रिय व्यक्तिला चांदीचा हत्ती भेट द्या. आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. इतरांवर अवलंबून राहणे टाळा. तुमच्याकडून झालेल्या चुकीमुळे इतरांना दोष देऊ नका. कार्यालयातून घरी येताना वाहन सावधपणे चालवा. आरोग्याकडे लक्ष द्या. नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. फॅशनेबल कपडे परिधान करण्याची इच्छा होईल.
शुभरंग : निळा

सिंह (LEO – Wednesday, October 19, 2022)
लाल रंगाचा रुमाल सोबत ठेवा. दाताचे आणि पोटाचे आरोग्य जपा. आराम करण्यासाठी वेळ काढाल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंब, मित्रमंडळी, लहान मुले यांच्यासोबत वेळ घालवाल. आजचा दिवस मनाला उभारी मिळण्याचा दिवस आहे. पैसे कमविण्याच्या नव्या संकल्पना सुचतील. त्याचा लाभ घ्या.
शुभरंग : हिरवा

कन्या (VIRGO – Wednesday, October 19, 2022)
विष्णुसहस्त्रनामालीचे वाचन करा. तुमच्या विनयशील वागण्यामुळे समाजात कौतुक होईल. सकारात्मक राहाल. कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. खासगी माहिती गुप्त ठेवा. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्यातील कलाकौशल्याचा वापर कराल. अनपेक्षितपणे एखादी लाभदायक गोष्ट घडण्याची शक्यता आहे.
शुभरंग : पोपटी

तूळ (TULA- Wednesday, October 19, 2022)
धार्मिक कार्याकरिता देणगी द्या. मधाचे दान करा. आरोग्याच्या दृष्टिने आजचा दिवस चांगला आहे. मन उल्हसित असेल. तुमची स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळी काळजी घेतील. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या. तुमच्यातील अंगभूत गुणांना वाव मिळेल. कुटुंबातील लहान मुलांसाठी वेळ काढाल.
शुभरंग : खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, October 19, 2022)
दररोज सकाळी तुळशीला पाणी घालून नमस्कार करा. श्रीकृष्णाजवळ कापूर लावा. इतरांमधील चांगले गुण पाहायला शिका. गरजूंना मदत करा. प्रिय व्यक्तिंच्या भेटीगाठी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. वाणसामानाची खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. घराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घ्याल.
शुभरंग : चॉकलेटी

धनु (SAGITTARIUS – Wednesday, October 19, 2022)
ब्यूटिपार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळेल. आजचा दिवस आनंददायी आहे. आखलेल्या योजना पार पाडू शकाल. कार्यालयातून लवकर घरी जाण्याचा प्लॅन कराल. सायंकाळी सिनेमा पाहण्याचा योग आहे. वरिष्ठांकडून मानाची वागणूक मिळेल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. अनावश्यक बोलण्यात वेळ वाया घालवू नका. स्वत:चेच म्हणणे खरे करण्याचा अट्टाहास करू नका.
शुभरंग : चंदेरी

मकर ( CAPRICORN – Wednesday, October 19, 2022)
मित्रमंडळींच्या सोबत महत्त्वाचा वेळ वाया घालवू नका. चंद्रप्रकाशात 15 ते 20 मिनिटे बसा. गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घ्या. विचारल्याशिवाय मत मांडायला जाऊ नका. आज एकांतात वेळ घालवायला आवडेल. खूप दिवसांपासून वाट बघत असलेल्या व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल. जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होण्याची शक्यता आहे. घरातील साफसफाई करण्यात वेळ जाईल.
शुभरंग : चिंतामणी

कुंभ (AQUARIUS -Wednesday, October 19, 2022)
गणपतीच्या मंदिरात प्रसाद वाटा. प्रभावी व्यक्तिंमुळे तुमचे मनौधैर्य वाढेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. राहते घर बदलणे शुभदायी ठरेल. प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कामात व्यस्त राहाल. इतरांकडून नको त्या अपेक्षा करू नका. कामात त्रयस्थ व्यक्तिचा हस्तक्षेप होत असेल तर ते तिच्या वेळीच लक्षात आणून द्या. नोकरीतील बदल स्वीकारावे लागतील.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Tuesday, October 18, 2022)
गरजू व्यक्तिंना मिठाई, भोजन, चटईचे दान करा. धनलाभाची शक्यता आहे. प्रेयसीला दुखवू नका. रिकाम्या वेळेत आवडीचे काम करणे पसंत कराल. वरिष्ठ कौतुक करतील. मनाजोगी खरेदी कराल. एखादे काम ऐनवेळी करावे लागल्यामुळे ठरवलेला प्लॅन विस्कळीत होऊ शकतो. पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : खाकी