Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’20 ऑक्टोबर’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Thurday, October 20, 2022)

नव्या गोष्टी शिकण्यात वेळ घालवाल. मेहनतीचं फळ चांगलेच मिळेल. घरातील दुभंगलेले सामान वेळीच घराबाहेर काढा. जोडीदार अस्वस्थ होणार नाही, याची काळजी घ्या. तुळशीच्या झाडाला पाणी घाला. व्यायाम आणि सूर्यनमस्कार करण्यासाठी वेळ काढाल. कलेत कौशल्य वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील. प्रिय व्यक्तिचा सहवास मिळेल
शुभरंग : पिवळा

वृषभ (TAURUS – Thurday, October 20, 2022)
ओराग्याची काळजी घ्या. सूर्योदयाच्या वेळी प्राणायाम करा. चांगल्या मार्गाने पैसे कमवण्याच्या नव्या संकल्पना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न कराल. सायंकाळी मित्रमंडळींमध्ये वेळ घालवाल. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे विचार मनात येतील. घरात सुख-शांती नांदेल. दररोज शिव मंदिरात जाऊन अभिषेक घाला. शिवाला बेलाचे पान वाहा.
शुभरंग : केशरी

मिथुन (GEMINI – Thurday, October 20, 2022)
आजचा दिवस मजेत जाईल. आवडते फुलझाड अंगणात लावा. त्याला खतपाणी घालून काळजी घ्या. सायंकाळी काही कारणानिमित्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. तुमच्या नव्या योजना जोडीदाराला सांगा. आवडता पोषाख खरेदी करण्यासाठी वेळ काढाल. मनोरंजनाचे कार्यक्रम पाहाल. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या.
शुभरंग : आकाशी

कर्क (CANCER – Thurday, October 20, 2022)
सूर्यनारायणाचा जप करा. मानसिक, शारीरिक थकवा दूर करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. व्यसन करू नका. जोडीदारासोबत खूप छान वेळ घालवाल. कार्यालयात नवी जबाबदारी सांभाळावी लागण्याची शक्यता आहे. तुमचे मत इतरांवर लादू नका. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. गोशाळेकरिता यथाशक्ती देणगी द्या. अतिचिंता करू नका.
शुभरंग : आकाशी

सिंह (LEO – Thurday, October 20, 2022)
घरातील उंबरठ्याची पूजा करा. अतिखाणे टाळावे लागेल. घरातील विजेच्या वस्तू वेळीच दुरुस्त करून घ्या. सायंकाळी घरी आलेल्या पाहुण्यांशी गप्पा मारण्यात वेळ घालवाल. समतोल आहार घ्या. एकांतात राहावेसे वाटेल. जोडीदाराला निराश करू नका. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल. देवीस्त्रोत्र वाचा. देवीच्या देवळात जाऊन दर्शन घ्या.
शुभरंग : खाकी

कन्या (VIRGO – Thurday, October 20, 2022)
मोत्यांच्या दागिन्यांची खरेदी करा. वरिष्ठांना मान द्या. आरोग्य चांगले राहिल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात वेळ जाईल. मेहनत आणि सहनशीलतेच्या आधारावर यश गाठाल. प्रवासात महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा. दत्त महाराजांचे स्मरण करा. अनावश्यक बोलण्यात वेळ घालवू नका. सायंकाळी प्रिय व्यक्तिसोबत खास बेत आखाल.
शुभरंग : जांभळा

तूळ (TULA- Thurday, October 20, 2022)
पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आहारात ऋतुमानानुसार मिळणाऱ्या फळांचा समावेश करा. घरातील लहान मुलांना गृहपाठ पूर्ण करण्यासाठी वेळ काढाल. दिनचर्या व्यस्त असेल. चुकीच्या संवादामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. सुमधुर संगीताचा लाभ घ्याल. गणपती अथर्वशीर्ष वाचा.
शुभरंग : तांबडा

वृश्चिक ( SCORPIO – Thurday, October 20, 2022)
शंकराची पूजा करा. पटकन रागावणे अडचणीत टाकू शकते. तुमच्याकडील नाविन्यपूर्ण संकल्पना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न कराल. कामाकडे लक्ष द्या. टीव्ही पाहण्यात वेळ वाया घालवू नका. धार्मिक कार्यात भाग घ्याल. इतरांच्या मतांचा आदर करा. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. आवडता पोषाख परिधान करा. घरात धूप करा. प्रसन्न वाटेल.
शुभरंग : चंदेरी

धनु (SAGITTARIUS -Thurday, October 20, 2022)
मोत्यांच्या दागिन्यांची खरेदी कराल. ताणतणावाचा सामना करण्यासाठी ध्यानधारणा, मेडिटेशन, योगासने कराल. निव्वळ नावे ठेवणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. कुटुंबिय आणि मित्रांबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. सायंकाळी दूरचे नातेवाईक घरी अनपेक्षितपणे येण्याची शक्यता आहे. कामात व्यस्त राहाल. बोटात सोन्याची अंगठी घाला. मन प्रसन्न करणाऱ्या गोष्टी करा.
शुभरंग : हिरवा

मकर ( CAPRICORN – Thurday, October 20, 2022)
दुधात हळद घालून प्या. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. क्षुल्लक वाद विसरून जा. मधुर संगीत कानी पडण्याची शक्यता आहे. प्रवास किंवा शैक्षणिक सहलीला जावे लागण्याची शक्यता आहे. आर्थिक योजनांचा लाभ घ्याल. प्रत्येक कामात संयम बाळगा. कोणतेही काम समजून उमजून कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आराध्यदेवतेचे दर्शन घ्या.
शुभरंग : चिंतामणी

कुंभ (AQUARIUS – Thurday, October 20, 2022)
आर्थिक व्यवहार करताना सावध राहण्याची आवश्यकता आहे. घरातील सदस्यांना समजून घेण्यात वेळ जाईल. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. काही वेळा योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते, हे लक्षात घ्या. काम करताना अधूनमधून विश्रांती घ्यावी लागेल. इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. सायंकाळी बागेत फिरायला जाल.
शुभरंग : सोनेरी

मीन (PISCES – Thurday, October 20, 2022)
गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. महत्त्वाची पण अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. आंघोळीकरिता लाल चंदनाचा वापर करा. मंदिर किंवा धार्मिक स्थळी जाणे आवडू लागेल. कुटुंबासाठी वेळ काढाल. कोणालाही तक्रार करायला वाव देऊ नका. प्रिय व्यक्तिसोबत वेळ घालवाल.
शुभरंग : राखाडी