
>> योगेश जोशी, [email protected]
आजचे पंचाग
तिथी – फाल्गुन शुद्ध नवमी
वार – शनिवार
नक्षत्र – आर्द्रा
योग – आयुष्मान
करण – तैतिल
राशी – मिथुन
आजपासून होलाष्टक सुरू होत असल्याने होळीपर्यंत कोणतीही शुभकार्य करता येणार नाहीत.
मेष
मेष राशीला आज मानसन्माचे योग आहे. तृतीय स्थानात चंद्र असल्याने सामाजुक क्षेत्रात दबदबा वाढणार आहेत. तसेच जवळचे प्रवास होण्याची शक्यता आहे. मात्र, व्यय स्थानात राहू असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच कामात अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. एकादश स्थानात शनि असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. चंद्र आणि शनीचे चांगले पाठबळ मिळणार आहे. त्यामुळे आज दिवसभरात प्रसन्नता जाणवणार आहे.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस फायद्याचा आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होणार असल्याने उत्साह वाढणार आहे. द्वितीय स्थानात चंद्र असल्याने आत्मविश्वासात वाढ होणार आहे. तसेच आय स्थानात राहू असल्याने अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता असल्याने मनावरील दडपण दूर होण्यास मदत मिळणार आहे. प्रथम स्थानात गुरु असल्याने अनेक गोष्टी मनासारख्या घडणार आहेत. नोकरीत बदली, बढतीचे योग आहेत. प्रगतीचे मार्ग खुले होतील. योग्य संधी हेरून त्याचा फायदा घेण्याची गरज आहे.
मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस उत्साह वाढवणारा आहे. प्रथम स्थानात चंद्र असल्याने कोणतेही कार्य आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मात्र, दशम स्थानात राहू असल्याने कार्यक्षेत्रात सावध राहण्याची गरज आहे. सुटीचा दिवस असल्याने आराम करण्याची इच्छा होईल. मात्र, कोणतीही कामे उद्यावर ढकलू नका. अन्यथा पुढील काळात त्याचा त्रास होणार आहे. मन प्रसन्न ठेवल्यास दिवस आनंदात जाणार आहे. प्रथम स्थानातील चंद्र आणि भाग्य स्थानातील शनिमुळे अनेक गोष्टींसाठी सहकार्य मिळण्याचे योग आहेत. मात्र, व्यय स्थानातील गुरुमुळे आध्यात्मिक कार्यात आवड निर्माण होणार आहे. एखाद्या धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस संयमाने घालवावा लागणार आहे. व्यय स्थानात चंद्र असल्याने अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे.तसेच काही गोष्टींमुळे मनावर दडपण येण्याची शक्यता आहे. नवम स्थानात राहू असल्याने कामांचे योग्य नियोजन केल्यास नशिबाची साथ मिळणार आहे. मात्र, बोलण्यात संयम ठेवत वादविवाद टाळण्याची गरज आहे. अष्टम स्थानात शनी असल्याने प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. जुने रोग डोके वर काढण्याची शक्यता आहे. एकादश स्थानातील गुरुमुळे आजचा दिवस आनंदात जाणार आहे. कार्यक्षेत्रातून एखादी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांना आज आर्थिक फायद्याचे योग आहेत. आधी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. एकादश स्थानातील चंद्रामुळे नवे आर्थिक स्रोत खुले होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्येक संधीचे सोने करण्याची गरज आहे. चंद्र आणि गुरुच्या पाठबळामुळे अनेक कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र, अष्टम स्थानात राहू असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे. सप्तमातील शनीमुळे व्यवसायवाढीचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, व्यवसायातील भागीदार आणि सहकाऱ्यांशी वादविवाद टाळण्याची गरज आहे. आजचा दिवस सिंह राशीसाठी सकारात्मक ठरणार आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांचा आज कार्यक्षेत्रात दबदबा निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्म स्थानात चंद्र असल्याने कार्यक्षेत्रात नावलौकिक मिळेल. केलेल्या चांगल्या कामामुळे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. भाग्य स्थानात गुरु असल्याने नशिबाची चांगलीच साथ मिळणार आहे. मात्र, सप्तम स्थानात राहू असल्याने जोडीदाराशी किंवा व्यवसायातील भागीदारांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. षष्ठ स्थानात शनी असल्याने स्पर्धापरीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच उधार उसनवारी टाळण्याची गरज आहे. तसेच रोग आणि शत्रू त्रास देण्याची शक्यता आहे. येत्या काही काळात कर्ज घेणे टाळावे. कार्यक्षेत्रातील वातावरण चांगले असल्याने आजचा दिवस प्रसन्नतेत जाणार आहे.
तूळ
तूळ राशीच्या लोकांना आज नशीबाची चांगलीच साथ मिळणार आहे. भाग्य स्थानात गुरु असल्याने अनेक सकारात्मक गोष्टी घटणार आहेत. त्यामुळे आत्मविश्वास ठेवत रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. त्याचबोरबर षष्ठ स्थानात राहू असल्याने गुप्तशत्रूंवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. मात्र, बुद्धीचातुर्याने त्यावर मात करता येणार आहे. पंचम स्थानात शनी असल्याने मुलांच्या संदर्भात शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. परदेशातून काही शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. गुतंवणुकीसाठी योग्य प्रयत्न केल्यास पुढील काळात त्याचा फायदा होणार आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीने आज प्रकृतीची काळजी घेण्याची गरज आहे. प्रवास किंवा अतिमेहनतीची कामे टाळावीत. अष्टम स्थानात चंद्र असल्याने मनःशांती टिकवण्यासाठी संयमाने वागावे लागणार आहे. विनाकारण वादविवाद टाळावे लागतील. अष्टम स्थानातील चंद्रामुळे अचानक धनलाभ किंवा सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.तसेच संपत्तीबाबातचे वाद मिटण्यासाठी प्रयत्न केल्यास त्याचा फायदा होणार आहे. चतुर्थ स्थानातील शनीमुळे कुटुंबीयांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. संयम ठेवा आणि प्रकृतीकडे लक्ष दिल्यास आजचा दिवस समाधानाने घालवता येणार आहे.
धनु
धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची चांगली साथ मिळणार आहे. मात्र, व्यवसायातील भागीदार आणि जोडीदाराशी वादविवाद टाळावे लागणार आहेत. जोडीदाराचे म्हणणे समजून घेत त्यांच्या कलाने घेतल्यास त्यांची साथ मिळणार असल्याने अडचणींवर मात करणे शक्य होणार आहे. सप्तम स्थानात चंद्र असल्याने व्यवसायवाढीचे योग आहेत. चतुर्थ स्थानात राहू असल्याने कुटुंबियांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्याशी सुसंवाद ठेवल्यास मतभेद टाळता येतील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता असल्याने तुमचा उत्साह आणि आनंद वाढणार आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र असणार आहे. चंद्र षष्ठ स्थानात असल्याने नको असलेली कामे करावी लागतील. कार्यक्षेत्रात आणि घरातही कामाचा व्याप वाढणार आहे. मात्र, ती कामे लवकर मार्गी लावल्यास पुढे येणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत. अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या चांगल्या संधी आता मिळण्याचे योग आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तृतीय स्थानातील राहूमुळे भावंडाशी वादविवाद होणार नाही, याची काळजी घ्या. द्वितीय स्थानातील शनीमुळे चांगले आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आज शुभ वार्ता मिळण्याचे योग आहेत. मुलांबाबत शुभवार्ता समजल्याने घरात उत्साही वातावरण असणार आहे. चंद्र पंचम स्थानात गुरुसोबत असल्याने मुलांच्या प्रगतीसाठी हा चांगला काळ आहे. या शुभयोगामुळे अनेक चांगल्या संधी दृष्टीक्षेपात येणार आहेत. दुसऱ्या स्थानात राहू असल्याने कुटुंब,सहकारी आणि मित्रांशी जुळवून घेतल्यास त्यांचे चांगले सहकार्य मिळण्याचे योग आहेत. तसेच संपत्ती किंवा आधी केलेल्या गुंतवणुकीतून अचानक चांगले आर्थिक लाभ होणार आहेत. प्रथम स्थानात शनी असल्याने नकारात्मक विचारांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यावर मात करत पुढे जाण्याची गरज आहे.
मीन
मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. त्यासाठी कुटुंबाला जास्त वेळ द्यावा लागणार आहे. चतुर्थ स्थानात चंद्र असल्याने घरासाठी खरेदीचे योग होत आहेत. त्यामुळे तुमचा कामाचा व्याप कमी होणार आहे. प्रथम स्थानात राहू असल्याने मनावरील दडपण दूर करत सकारात्मक विचार ठेवण्याची गरज आहे. विनाकारण राग येणे, चिडचीड होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीनेही आजचा दिवस चांगला जाणार आहे. मात्र, खर्च करताना विचार करावा लागणार आहे.























































