
युजर्सच्या प्रायव्हसीचा विचार करता गुगल लवकरच डेटा सेफ्टी फिचर लॉंच करणार आहे. या फीचरमुळे अॅन्ड्रॉईड युजर्सना त्यांचा पर्सनल डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत होणार आहे. प्ले स्टोअरवर सध्या लाखो अॅप उपलब्ध आहेत. एखाद अॅप इन्स्टॉल करताना युजर्सकडून अनेक गोष्टींसाठी परवानगी घेतली जाते. त्यामुळे हे अॅप तुमचा कोणता डेटा गोळा करते आणि तो डेटा कुठे शेअर केला जातो, याची माहिती आता युजर्सना मिळणार आहे. एका वेबसाईटच्या माहितीनुसार, हे फीचर आधी गुगल प्ले कंसोलला दिले जाईल त्यानंतर आठवडाभराने इतर अॅन्ड्रॉईड युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.


























































