मुकणे धरणात अनोळखी पुरुषाचा मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी, इगतपुरी

इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणाच्या फुगवटय़ात एका 35 ते 40 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. या व्यक्तीच्या उजव्या हातावर दा. भा. जाधव असे गोंदलेले असून टी शर्टवर ‘श्री गजानन गणेश मंडळ, कारला’ असे लिहिलेले आहे. कोणी संबंधित नातेवाईक असल्यास त्यांनी वाडिवऱहे पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक एस. एच. देशमुख यांनी केले आहे.

शरीराने मध्यम, रंग सावळा, उंची 167 सेंमी. मात्र केवळ उजव्या हातावर दा. भा. जाधव असे गोंदलेले आढळून आले आहे. या अनोळखी मयत पुरुषाला कोणी ओळखत असल्यास त्यांनी त्वरित वाडिवऱहे पोलिसांशी 02553 236533 या क्रमांकावर संपर्क करावा.