दीपिकाने दिला ‘मामि’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने ’मामि’ अर्थात ’मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तिनेच इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. 2019 साली तिने ’मामि’च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.

इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत दीपिकाने म्हटलंय, ’मामिच्या संचालक मंडळात अध्यक्ष म्हणून जबाबदारी पारं पाडणं हा अनुभव खूप काही शिकवणारा होता. जगभरातून चित्रपट आणि प्रतिभावान कलावंतांना मुंबईमध्ये केंद्रित करणे हे खूप जबाबदारीचे काम होते. परंतू माझ्या कामाचं सध्याचं नियोजन पाहता मी ’मामि’च्या कामाकडे आवश्यक तितके लक्ष देऊ शकत नाही. मला आशा आहे की, संघटनेची सूत्र योग्य व्यक्तीच्या हातात सोपवली जावी. माझे या संघटनेशी असलेले ऋणानुबंध शेवटपर्यंत असेच कायम राहतील.’

आपली प्रतिक्रिया द्या