
सामना प्रतिनिधी । जालना
राज्यातील अनेक भागात गुरुवारी त्रिपुरारी पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जालना जिल्ह्यातील अंबड येथील ग्राम दैवत असलेल्या मत्स्योदरी देवी मंदिर परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने पाच हजार दिव्यांची आरास करण्यात आली होती. या दिव्यांच्या प्रकाशाने देवी मंदिर परिसर उजळून निघाला होता.


























































