
चंद्रपुर येथे रेल्वेच्या धडकेत चितळ ठार झाल्याची घटना घडली आहे. सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांच्या मृत चितळ नजरेस पडल्याने ही घटना उघडकीस आली. गोंदिया चंद्रपूर रेल्वे मार्गावर अनेक एक्सप्रेस चालतात. ही घटना पहाटेच्या सुमार घडली. घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी घटना स्थळी पोहचले व पंचनामा केला. मूल ते चंद्रपुर दरम्यान घनदाट जंगल आहे, या जंगलातुन रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे रेल्वेच्या धडकेत अनेक वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.






























































